पायल घोषच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनुराग कश्यपला पाठवला समन्स

By  
on  

अभिनेत्री पायल घोषने अनुरागवर लैंंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. हा गुन्हा वर्सोवा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या पीडीत अभिनेत्रीने आणि तिचे वकील एड. नितीन सातपुते यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. 
त्यानंतर अनुराग कश्यपला सकाळी 11 वाजता वर्सोवा पोलिस स्टेशनला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

 

 

या प्रकरणात भारतीय दंड संहिता (आईपीसी) चं कलम 376 (I) (बलात्कार)च्या अनुषंगाने प्रकरणाचा तपास करत आहेत. पायल काही दिवसांपुर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यासोबतच पायलने अनुराग विरोधात कोणतीही अ‍ॅक्शन न घेतल्यास तर ती उपोषण सुरु करणार असल्याचं सांगितलं होतं. अनुरागने मात्र तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे प्रकरण 2014 मध्ये घडलं होतं.

Recommended

Loading...
Share