By  
on  

...........म्हणूनच आलियामुळे रणबीरला घेता आलं आजीचं अंत्यदर्शन

कृष्णा राज कपूर यांचं सोमवारी निधन झालं. संपूर्ण कपूर कुटुंबियांबरोबरच अवघं बॉलिवूड त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. पण या संपूर्ण गर्दीत आश्चर्य करण्यासारखी एकच गोष्ट होती ती म्हणजे ऋषी कपूर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मात्र अनुपस्थित होतं.

ऋषी कपूर यांनी ट्विट करुन माहिती दिली होती की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी परदेशी जावं लागणार आहे. ते परदेशी उपचार घेत असतानाच इथे भारतात कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं. पण उपचार अर्धवट टाकून त्यांना भारतात परतणं शक्य नव्हतं. त्यांच्यासोबत पत्नी नितू कपूर आणि रणबीर कपूरसुध्दा आहेत.म्हणूनच हे संपूर्ण कुटुंब याप्रसंगी अनुपस्थित होतं. पण परदेशात असलेल्या रणबीरला आजीचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी आलियाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराच्या ठिकाणाहून व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क केला. पण नेटवर्कच्या कारणास्तव मध्येच त्यांचा संपर्क तुटला.

https://www.instagram.com/p/BobUV20hQ0P/?taken-by=peeping.moon

सोशल मीडियावर या प्रसंगांचाच आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात आलिया जणू काही कपूर कुटुंबाचाच एक हिस्सा असल्याप्रमाणे मोठ्या जबाबदारीने वावरताना दिसून आली. म्हणूनच रणबीर आणि आलियाच्या नात्यावर आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive