By  
on  

वाळवंटात खिलाडी कुमारने केली स्टंटबाजी;पाहा व्हिडीओ

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारची खिलाडी वृत्ती आपण सर्वच जाणतो. अक्षय कुमार नेहमीच विविध स्पोर्ट्स आणि अॅक्टिव्हीटीमध्ये सहभागी होत असतो. आपल्या सिनेमांमध्ये स्टंट कोणत्याही एक्स्ट्रा इफेक्ट्सशिवाय स्वत: लिलया करण्यासाठी अक्षय कुमार प्रसिध्द आहे. सध्या अक्षय हाऊसफुल 4 च्या शूटींगसाठी जैसलमेरमध्ये आहे. सिनेमाच्या व्यस्त शेड्यूलमधूनसुध्दा वेळ काढत तेथील काही खास क्षण तो नेहमीच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर करत असतो.

अक्षयने नुकताच जैसलमेर येथून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो वाळंवटात सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद घेतोय. विशेष म्हणजे सायकल चालवताना तो काही स्टंटदेखील करत असून हा व्हिडिओ अक्षयने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण या व्हिडीओसोबत अक्कीने चाहत्यांना हा स्टंट रस्त्यांवर करु नये असा विशेष संदेशसुध्दा दिला आहे.

मार्शल आर्ट्स एक्सपर्ट असेलल्या अक्षयचे हे फिटनेस फंडे चाहत्यांना याबाबत जागरुक करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील यात शंका नाही.

साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल 4’ सिनेमाचं पहिलं शेड्यूल पूर्ण झाल्याचं वृत्त आहे तर दुसरं शेड्यूल लवकरच सूर्यगढ पॅलेस येथे सुरू होणार आहे. हाऊसफुलच्या या आगामी सिरीजमध्ये अक्षयसोबतच नाना पाटेकर, रितेश देशमुख, कृती खारबांदा, बॉबी देईल, कृती सॅनन झळकणार आहेत.

https://www.instagram.com/p/BodRlR0AG5p/?taken-by=akshaykumar

Recommended

PeepingMoon Exclusive