डेझी शाहने नोंदवला आपला जबाब,‘तनुश्रीसोबत काहीतरी घडलं होतं’

By  
on  

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप केल्यानंतर संपूर्ण सिनेविश्वात जणू मी टू नावाचं वादळच घोंघावू लागलं. मग अनेक अभिनेत्री पुढे येऊन आपल्यावर घडलेल्या त्या प्रसंगाला वाचा फोडू लागल्या.

तनुश्री-नाना प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह ही मुंबई पोलिसांसमोर हजर झाली आणि याप्रकरणी तिने आपला जबाब नोंदवला आहे. सूत्रांनुसार, डेझीने या जबाबात तनश्रीसोबत घडलेल्या गैरवर्तवणुकीला स्पष्ट मान्यता दिली नसली तरी ही घटना अमान्यसुध्दा केलेली नाही. नक्की काय, घडलं हे सांगता येणार नाही पण सेटवर जेव्हा गोंधळ सुरु झाला होता तेव्हा तिथून मी दूर निघून गेले होते.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्याबरोबर हॉर्न ओकेच्या सेटवर घडलेल्या तथकथित प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह एक महत्त्वाची साक्षीदार आहे. 2008 साली हॉर्न ओके सिनेमासाठी ती प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची सहाय्यक म्हणून कार्यरत होती. नृत्यासाठी ती तनुश्रीला स्टेप्ससाठी मार्गदर्शन करत असे. ज्यावेळी तनुश्रीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार घडला, तेव्हा सर्वप्रथम तिने याची कल्पना डेझीला दिली होती.

Recommended

Loading...
Share