By  
on  

पाहा Video : तुमचे दात तुटले तर मी जबाबदार नाही – मिलिंद सोमण 

फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन अशी ओळक असलेला हँडसम मिलिंद सोमण सोशल मिडीयावरही चांगलाच चर्चेत असतो. त्याचे फिमेल फॉलोवर्स तर आहेतच मात्र त्याचा फिटनेस पाहून फिटनेस प्रेमीही त्याच्यावर फिदा आहेत. नुकताच मिलिंदने पोस्ट केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. याचं कारण आहे मिलिंदने केलेलं वर्कआउट. या व्हिडीओत मिलिंद सुपरमॅन पुशअप्स करताना दिसतोय. स्लो मोशन इफेक्ट दिलेल्या या व्हिडीओती हे पुशअप्स कमाल दिसत आहेत. मात्र चाहत्यांनी खबरदारी घ्यावी यासाठी या पोस्टमध्ये दिलेलं कॅप्शनही मजेशीर आहे.

 

मिलिंदने ट्विट केलेल्या या व्हिडीओत कॅप्शन लिहीलय की, “काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही जर कराल तर काळजी घ्या आणि जर तुमचे दात तुटले तर मी जबाबदार नाही.” असं म्हणत मिलिंदने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

सोशल मिडीयावर त्याची पत्नि अंकितासोबतचे त्याचे व्हिडीओ आणि फोटो पसंत केले जातात. 
  
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive