सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : रियाला आता ईडी बजावणार आर्थिक अफरातफरीसाठी समन्स, होणार चौकशी

By  
on  

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दीड महिना उलटून गेला आहे आणि या प्रकरणाच्या तपासाला दररोज वेगवेगळी दिशा मिळतेय,अशातच काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडीलांनी पटना येथे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्येच्या तपासाने आता चांगलाच जोर धरलाय. रियाकडे सर्वजण आता संशयी नजरेने पाहतायत किंबहुना तिलाच सुशांतच्या आत्महत्येसाठी चाहते जबाबदार धरु लागले आहेत. 

आता याप्रकरणातील आणखी  एक अपडेट म्हणजे, ईडीला पोलीस तपासाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. आता रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालय रियाला समन्स बजावण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या वडीलांनी के.के सिंग ह्यांनी एफआयआरमध्ये सुशांतच्या बॅंक खात्यातून १५ कोटी गहाळ झाल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी ईडी सुशांतच्या बॅंक खात्यांसोबतच  Vividrage RhealityX Pvt. and Front India या त्याच्या दोन कंपन्यांचीही चोकशी करणार आहे. त्यापैकी  Vividrage RhealityX  या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती हे  डिरेक्टर आहेत.

ईडी सुशांतच्या सर्व बॅंक खात्यांचा कसून तपास घेणार आहे. कोणी पैशाची अफरातफर केली ते या ईडीच्या तपासात समोर येईल. 

Recommended

Loading...
Share