By  
on  

करोनाशी झुंज देणारा अभिषेक बच्चन शाहरुखचं हे गाणं ऐकून करतोय स्वत:ला प्रोत्साहित

संपूर्ण बच्चन परिवारावर करोनाचं सावट पसरलंय हे तुम्हाला, माहितचं आहे. आधी ऐश्वर्या आणि आराध्या करोनामुक्त होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्या. त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चनसु्ध्दा आले. परंतु अभिषेक बच्चन मात्र अद्याप रुग्णालयात करोनाशी झुंज देतोय. गेल्या २८ दिवसांपासून अभिषेक हॉस्पिटलमध्ये आहे. करोरनावर उपचार घेत आहे. तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपली हेल्थ अपडेट देत असतो. वडील बिग बींच्या शिकवणीप्रमाणे सतत स्वत:ला प्रोत्साहित करतो. 

आत्ता नुकतंच अभिषेकने स्वत:ला प्रोत्साहित करण्यासाठी मित्र आणि  अभिनेता शाहरुख खानच्या गाण्याचा वापर केला आहे. 'यु ही चला चल राही...' हे शाहरुखच्या स्वदेस या सुपरहिट सिनेमातलं गाणं ऐकून तो या परिस्थितून लवकरच बाहेर पडण्यासाठी स्वत:ला  प्रेरणा देत आहे. 

अभिषेकची करोना टेस्ट मात्र अजूनही निगेटिव्ह आली नसल्याने त्याला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागलं आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांना 11 जुलैला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive