सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडी कडून आज पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी रिया ईडी कार्यालयात भाऊ शोविक चक्रवर्तीसह पोहचली आहे. रियाला दुस-यांदा आणि तिचा भाऊ शोविकला तिस-यांदा ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. पैशांच्या अफरातफरीचा आरोप या दोघांवर आहे.
रिया चक्रवर्तीची यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी ईडीने आठ तास चौकशी केली होती.
‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूअसेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये’, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पुन्हा पोहोचली आहे.
अवघ्या देशाचं लक्ष सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील या नागमोड्या वळणांकडे लागलं आहे. तसंच ईडीच्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्यातून या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळेल अशी सुशांतच्या चाहत्यांना आशा आहे.