बहीण सोहा अली खानकडून भाऊ सैफला तो बाबा होणार असल्याच्या अशा हटके अंदाजात शुभेच्छा

By  
on  

पिपींगमूनने सगळ्यात आधी करीना कपूर खानच्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. त्यानंतर मात्र करिना आणि सैफ अली खानने ही गुड न्यूज सगळ्यांना एका स्टेटमेंटच्या माध्यमातून दिली. आणि ही गु़ड न्यूज मिळाल्यानंतर अनेकांनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे.

सोहा या पोस्टमध्ये लिहीते की, "मी स्वत:ला थांबवू शकत नाही, अभिनंदन करीना, सरक्षित आणि स्वस्थ राहा नेहमीसारखी." तर दुसरीकडे सैफ अली खानचा फोटो पोस्ट करून सोहा म्हणते की, "द क्वॉडफादर."

सोहाने सैफला हटके अंदाजात त्याचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon!! Couldn’t resist! Congratulations @kareenakapoorkhan be safe and healthy - and radiant as ever ! ️

A post shared by Soha (@sakpataudi) on

 

सैफ-करीना ने ही गुड न्यूज शेयर करताना त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहीलय की, "आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही आमचा परिवार वाढवण्याचा विचार करतोय. सगळ्या शुभचिंतकांना प्रेम आणि धन्यवाद."  

Recommended

Loading...
Share