By  
on  

Photos: ह्या ब्लॅक आणि व्हाईट फोटोंमध्येसुध्दा ऋता दुर्गुळे दिसते खुपच खास

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. फुलपाखरु या मालिकेमुळे ऋताचा खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. मालिकांसोबतच नाटक विश्वात आपली ओळख निर्माण करणा-या ऋता आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली हे. ऋताच्या अभिनयाने सजलेला अनन्या हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. पण तत्पूर्वी सिंगीग स्टार या गाण्यांच्या रिएलिटी शोची निवेदिका म्हणून ऋताने आपल्या करिअरची नवी इनिंग खेळण्यास सुरुवात केली आहे. 

ऋताचे सोशल मिडीयावर सर्वाधिक फॅन फॉलोवर्स आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक आणि व्हाईटमधील तिचे बरेच लोभस फोटो पाहायला मिळतात. 

तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेता उमेश कामतसोबत ऋताने दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात झळकून रंगभूमी गाजवली.

मालिका, नाटक आणि सिनेमा यांतून अभिनय करताना दिसणारी ऋता सूत्रसंचालनाचा नवा प्रयत्न करतेय. तिच्यासाठीदेखील हा अनुभव नवीन असणार आहे आणि या नव्या अनुभवासाठी तीदेखील उत्सुक आहे. 

 

 

 

रंगभूमीवर गाजलेलं अनन्या हे नाटक आता चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येणार आहे. ऋता यात अनन्या साकारतेय. अतिशय प्रेरणादायी असं कथानक या चित्रपटातून मांडण्यात आलं असून, अनन्या साकारण्यासाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं घेतलेले कष्ट प्रेरणादायी आहे

 

 

 

विविध मूडसमधील ऋताचे हे ब्लॅक आणि व्हाईटमधील फोटो लक्षवेधी ठरतायत,

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive