By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांची झाली जिजाशी गाठ

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत आता वहिनीसाहेब म्हणजेच नंदिता वहिनीची पुन्हा एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री धनश्री काडगांवकरच्या जागी आता अभिनेत्री माधुरी पवार ही भूमिका साकारतेय. मात्र आता वहिनीसाहेबांची एन्ट्री झाल्यावर जेव्हा ती जिजाला भेटते तेव्हा काय घडतं हे सध्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता साधीभोळी अंजली नाहीये तर त्या जागी बिनधास्त जिजा पाहायला मिळतेय. 

आता वहिनीसाहेबांची गाठ जिजाशी झाल्याचं मालिकेत पाहायला मिळतय. एकीकडे अंजलीबाईच्या साध्याभोळ्या स्वभावाचा नंदिता वहिनीने अनेकदा फायदा घेतला. मात्र आता बिनधास्त जिजा आणि वहिनीसाहेबांची टशन आता मालिकेत रंजक वळण देत आहे.

 

या मालिकेत आता शिक्षा भोगून झाल्यानंतर वहिनीसाहेबांची पुन्हा एन्ट्री झाल्याने बरीच उलथापालथ होताना पाहायला मिळतय. तेव्हा मालिका आता काय रंजक वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive