By  
on  

पाहा Video : 'हीरो सरपंच' गाण्याला गायक अवधूत गुप्तेचा आवाज, अवधूतने शेयर केली लॉकडाउनची ही गोष्ट

गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी अवधूत गुप्ते एक नवं गाणं घेऊन आला आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी एका संकल्पनेतून हीरो सरपंच हे गाणं समोर आणलं. या गाण्याला अवधूत गुप्तेचं संगीत लाभलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने अवधूत गुप्ते आणि गायक आदर्श शिंदे यांनी पहिल्यांदाच डुएट गाणं गायलं आहे. शिट्या वाजवायला आणि थिरकायला भाग पाडणारं असं हे गाणं आता अनेकांच्या पसंतीस पडतय. 

या गाण्याच्या लाँच सोहळ्याला अवधूतने पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी अवधूतने या गाण्याची संकल्पनेविषयी सांगितलं. लॉकडाउनच्या काळात संरपंचांसारखे अनेक हीरो होते ज्यांनी लोकांना मदत केली. हे सांगताना अवधूतने त्याच्या लॉकडाउनचाही एक अनुभव शेयर केला. 

Recommended

PeepingMoon Exclusive