अभिनेता प्रणव रावराणे पुन्हा एकदा एक लव्हस्टोरी सिनेमात दिसणार आहे. 'प्रीतम' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रणव अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रणवने पिपींगमून मराठीशी संवाद साधला. यावेळी प्रणवने त्याच्या या सिनेमातील भूमिकेविषयी सांगीतलं.
या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान रोमँटिक सीन करताना प्रणव कॅमेराजवळ पत्नीचा फोटो लावत असल्याचं त्याने यावेळी गंमतीत सांगीतलं. या सिनेमाच्या निमित्ताने प्रणवची प्रीतम ही भूमिका पाहायला मिळणार आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल.