'फर्जंद' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अंकीत मोहन आता पावनखिंड या आगामी सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अंकीतशी संवाद साधला. यावेळी पात्राविषयी जरी त्याने सांगीतलं नसलं तरी या सिनेमात तो एक महत्त्वाचं पात्र साकारत असल्याचं म्हटला.
या सिनेमासाठी अंकीतने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी तो धनुर्विद्या शिकला असल्याचं त्याने सांगीतलं. शिवाय त्याच्या फिटनेसविषीही तो बोलला.