एखाद्या मालिकेच्या कहाणीत नकारात्मक भूमिका साकारणारं पात्र असेल तर त्या कहाणी आणखी रंजक वाटू लागते. सध्याच्या काही लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये असेच काही खलनायक, खलनायिका आहेत जे प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेत आहेत. अशाच काही लोकप्रिय व्हिलन्सशी पिपींगमून मराठीने संवाद साधला आहे. 'नायक-खलनायक' सिरीजच्या माध्यमातून या कलाकारांचा खलनायक साकारण्याचा प्रवास त्यांनी शेयर केला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने या सिरीजमध्ये तिचा खलनायिका साकारण्याचा प्रवास शेयर केलाय. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री अदिती सारंगधर मालविका हे पात्र साकारतेय. अदितीने या पात्रातील बारकावे या मुलाखतीत शेयर केले आहेत. 'देवमाणूस' या मालिकेचा नायक आणि खलनायक असलेला अभिनेता किरण गायकवाडनेही त्याचा अनुभव शेयर केला आहे. 'श्रीमंताघरची सून' या मालिकेत नव्याने एन्ट्री केलेल्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यादेखील खलनायिका साकारत आहेत. त्यांनी आजवर साकारलेल्या खलनायिका आणि या पात्रातून त्यांना मिळणारा आनंद, समाधान त्यांनी शेयर केलाय. तर 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून दृष्ट श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरेने देखील तिच्या अभिनयाची सुरुवात आणि पहिल्याच मालिकेत खलनायिका साकारणं यावषियी मिळणाऱ्या प्रतिक्रिया यावर ती बोलती झाली आहे.
लवकरच 'नायक - खलनायक' ही मुलाखतींची सिरीज पिपींगमून मराठीवर प्रदर्शित होणार आहे.