Nayak - Khalnayak : "खलनायिका जास्त फेमस होतात" म्हणत सुप्रिया पाठारे यांनी सांगितला खलनायिका साकारण्याचा प्रवास

By  
on  

श्रीमंताघरची सून या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे या आता देविकाच्या भूमिकेत झळकत आहेत. याआधीही खलनायिका साकारलेल्या सुप्रिया आता पुन्हा एकदा देविकाच्या रुपात नकारात्मक भूमिका साकारत आहेत. नायक-खलनायक सिरीजच्या निमित्ताने सुप्रिया यांनी खलनायिका साकारण्याचा त्यांचा प्रवास शेयर केला आहे. नाटक, मालिका, चित्रपटात विशेषकरुन विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या सुप्रिया पाठारे या जेव्हा खलनायिका म्हणून समोर येतात तेव्हा त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळतो.

मालिकेत खलनायक-खलनायिका नसतील तर कोणतीच सूत्र हलणार नाहीत असं सुप्रिया सांगतात. शिवाय प्रेक्षक खलनायिकांवर जास्त प्रेम करतात आणि अशा भूमिका या जास्त प्रसिद्ध होतात असं सुप्रिया यावेळी म्हटल्या आहेत. खलनायिका साकारताना एक्सप्रेशन म्हणजेच हावभावांची जुगलबंदी असल्याचही त्या सांगतात. सुप्रिया यांना खलनायिका साकारायला प्रचंड आवडतं असं म्हणत त्यांनी आत्तापर्यंतचा खलनायिका साकारण्याचा अनुभवही शेयर केला आहे.

Recommended

Loading...
Share