मागील वर्षापासून ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राताला बसला आहे. टेलिव्हिजन मालिका आणि इतर कार्यक्रमाचं चित्रीकरण सध्या सुरळीत सुरु आहेत. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद असल्याने त्याचा मोठा फटका कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना बसलाय. दिग्दर्शक विजू माने यांच्याशी नुकतच पिपींगमून मराठीने संवाद साधला. यावेळी विजू माने यांनी सध्या सिनेमा आणि नाटकांसाठी काम करणाऱ्या कलाकारांची अवस्था दारुण असल्याचं सांगितलं.
दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे काही मोजक्या लोकांना, विशेषकरून मालिकांमध्ये काम करणाऱ्यांना कमी त्रास झाला पण नाटक आणि सिनेमा कलाकार देशोधडीला लागल्याचं ते सांगतात. सिनेमागृह चालवणारे, त्यांचा स्टाफ, त्यांचा परिवार यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलय. शिवाय ते स्वत:ही कर्जात बुडाल्याचं सांगतात. मनोरंजन क्षेत्रातील सिनेमा आणि नाटक विभाग संपूर्णपणे ढासळल्याचही विजू माने म्हटले आहेत.