पाहा Video : यासाठी प्रिया बापट राजकारणापासून पळते, 'सिटी ऑफ ड्रिम्स 2' च्या निमित्ताने खास गप्पा

By  
on  

'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या पहिल्या सिझननंतर आता नुकतच या सिरीजचं दुसरं सिझन प्रदर्शित झालय. अभिनेत्री प्रिया बापट या सिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारतेय. या सिरीजच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने प्रियासोबत खास बातचीत केलीय. यावेळी प्रियाने ही भूमिका साकारण्याचा अनुभव शेयर केलाय. 

यावेळी प्रियाने राजकारणाविषयी असलेली तिची मतं सांगितली. प्रिया ही स्वत: स्पष्टवक्ति मुलगी असूनही काहीवेळा तिच्या मनातील स्पष्ट विचारांना सामोरं जायला तयार नसते. त्यामुळे प्रिया ही राजकारणापासून पळत असल्याचं सांगते. शिवाय वयाच्या विविध टप्प्यांवर साकारलेल्या भूमिकांविषयीही ती बोलली. वयाच्या 25व्या वर्षी केलेला 'काकस्पर्श' हा चित्रपट ते आता पूर्णिमा गायकवाड साकारणं या बदलाविषयीही तिने सांगितलं. 

 

Recommended

Loading...
Share