पहिल्या आणि दुसऱ्या यशस्वी सिझननंतर आता आणि काय हवं या वेब सिरीजचं तिसरं सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने उमेश कामत आणि प्रिया बापट हे रियल लाईफ कपल पुन्हा एकदा रील लाईफ कपल म्हणून पाहायला मिळणार आहेत. या सिरीजमधील साकेत आणि जुईची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने पिपींगमून मराठीने या दोघांसोबत खास बातचीत केलीय. यावेळी तिसऱ्या सिझनमध्ये साकेत आणि जुईचं नातं कसं नव्याने समोर येईल याविषयी दोघांनी सांगितलं.
तिसऱ्या सिझनमध्ये साकेत आणि जुईचं नात आणखी घट्ट झालेलं आणि मुरलेलं दिसणार असल्याचं यावेळी प्रिया बोलली. शिवाय या सिरीजच्या सिझन पाहुन अनेक कपलचे चांगले मेसेज येत असल्याचं उमेश सांगतो. रियल लाईफ कपल असल्याचे कोणतेही फायदे, तोटे काम करताना जाणवत नसल्याचं दोघं सांगतात. फक्त घरी एकत्र असताना डायलॉगची उजळणी एकत्र करता येते एवढाच फरक त्यांनी सांगितलाय. येत्या 6 ऑगस्टला 'आणि काय हवं 3' प्रदर्शित होणार आहे.