प्रत्येक नात्याप्रमाणे वडील - मुलाचं नातंही गुंतागुंतीचं ज्यात प्रेम, आदर, धाक अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याच नात्याची एक वेगळी बाजू बाप बीप बाप या वेबसिरीजमधून पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज प्रदर्शित होतेय. याच निमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेता तेजस बर्वे या कलाकारांसोबत पिपींगमून मराठीने खास बातचीत केलीय.
यावेळी या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांविषयी आणि सिरीजच्या विषयावर सविस्तर उत्तरं दिली. आजवर मोठ्या प्रमाणात खलनायकी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे या सिरीजच्या निमित्ताने विनोदी जॉनर असलेली भूमिका करतायत. तर मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळख असलेला तेजस मुलाची भूमिका साकारतोय. शरद पोंक्षे यांच्यासोबत काम करताना त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्याचं तो सांगतो.