पाहा Video : कला दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी असं सजवलय 'बिग बॉस मराठी 3' चे घर, पाहा मुलाखत

By  
on  

बिग बॉस मराठी 3 चं हे नवं पर्व सुरु होण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. प्रेक्षकांची उत्सुकताही प्रचंड वाढली आहे. यंदाच्या सिझनसाठी स्पर्धक कोण असणार यापासून बिग बॉस मराठीचं घर कसं सजवलं गेलय यापर्यंतही ही उत्सुकता ताणून धरली आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार हे बिग बॉस या कार्यक्रमाच घर कायम सुंदर पद्धतिने सजवतात. बिग बॉस मराठीच्या मागील दोन सिझनसाठीही त्यांनी घराचा खास लुक डिझाईन केला होता. यंदाही बिग बॉस मराठी 3 चं घर आकर्षणाचा विषय ठरतोय. पिपींगमून मराठीने नुकतीच या घराची सफर केली आहे. यावेळी कला दिग्दर्शक ओमंग कुमार स्वत: यावेळी उपस्थित होते. त्यांनी यंदाचं घर कसं डिझाईन केलं याविषयी सांगितलं.

इतक्या मेहनतीने सुंदर सजवलेलं घर कायम स्वच्छ रहावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून बिग बॉस मराठीचे स्पर्धक हे घर कायम निटनेटकं आणि स्वच्छ ठेवत असल्याचं सांगत ओमंग कुमार यांनी मराठी स्पर्धकांचं कौतुक केलं. शिवाय यंदा बिग बॉस मराठीच्या घरात मराठीपण मोठ्याप्रमाणात जपून त्याला आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Recommended

Loading...
Share