By  
on  

पाहा Video : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत या कलाकारांची दिसणार जोडी, मालिकेच्या सेटवर खास गप्पा

'ठिपक्यांची रांगोळी' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने एक मोठी स्टारकास्ट या पाहायला मिळेल. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. 

अभिनेता चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतिर्थकर ही जोडी या मालिकेतून पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत. पिपींगमून मराठीने या मालिकेच्या सेटवर जाऊन या दोघांशी गप्पा मारल्या आहेत. यावेळी दोघांनी त्यांच्या ऑफस्क्रिन मैत्रीविषयी सांगितलय. यावेळी चेतन हा एक उत्तम फोटोग्राफर असल्याचं ज्ञानदा सांगते. शिवाय तो सोशल मिडीयावर सक्रिय नसल्याने त्याला विविध पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं सांगते. दोघांची ऑफस्क्रिन चांगली बॉंडिंग असल्याने या जोडीला मालिकेत एकत्र पाहणं रंजक ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive