By  
on  

बिग बॉस वाले : बिग बॉस मराठी शो जिंकण्यासाठी शिव ठाकरेला कामी आला होता खरेपणा, खास मुलाखत

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन सध्या चर्चेत आहे. पहिल्या दोन सिझननंतर तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत. यातच या कार्यक्रमाची सोशल मिडीयावरही जोरदार चर्चा होत आहे. अशीच चर्चा पिपींगमून मराठीने बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता शिव ठाकरेसोबत केली आहे. यावेळी शिवने त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव शेयर केला. कधी कधी स्ट्रॅटेजी कशी फसते किंवा या खेळात खरं राहून कसं चांगलं खेळता येतं याविषयी त्याने सांगितलं. शिवाय तिसऱ्या सिझनमध्ये मीरा जगन्नाथ छान खेळत असल्याचं बोलला. शिवाय जय दुधाडे, स्नेहा वाघ, विशाल निकम, मिनल शाह, उत्कर्ष शिंदे हे स्पर्धक लक्ष वेधून घेत असल्याचं त्याने सांगितलं.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आल्यास बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी उत्सुक असल्याची इच्छाही त्याने यावेळी व्यक्त केली. यंदाच्या तिसऱ्या सिझनचं स्वरुप वेगळं आहे. याविषयी शिव म्हणतो की, "काही गोष्टी आमच्या सिझनला होत्या त्या आता नसतील ज्या आता आहेत त्या तेव्हा नसतील ही या खेळाची खासियत आहे." या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकाला समर्थन देतोय विचारल्यावर शिव म्हणतो की, "मी कायम बिग बॉस या कार्यक्रमाला सपोर्ट करणार."

Recommended

PeepingMoon Exclusive