पाहा Video : बिग बॉस मराठी 3 च्या घराबाहेर आल्यावर अक्षय वाघमारे म्हणतो "...तर मी अजूनही टिकलो असतो"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं एलिमिनेशन नुकतच पार पडलय. यावेळी अक्षय वाघमारे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहरे पडला. नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल निकमने अक्षयला नॉमिनेट केलं होतं. आणि वोट्स कमी मिळाल्याने अक्षय घरातून एलिमिनेट झाला. पिपींगमून मराठीने नुकतीच अक्षयसोबत बातचीत केलीय. यावेळी त्याने बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव सांगितलाय.

बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकम आणि अक्षय वाघमारेचे अनेकदा खटके उडताना दिसले होते. मात्र तो वाद फक्त टास्क पुरताच असल्याचं अक्षयने सांगितलं. अक्षय म्हणतो की, "विशाल हा माझ्या लहान भावासारखा आहे. त्यामुळे लहान भावासारखं असल्याने मी त्याला माफ करतो. मला वाटतं की विशालने प्रयत्न केले असते तर मी नॉमिनेट नसतो झालो. मी त्याला आधीही म्हटलं होतं की कोणत्याही दबावाखाली मला करु नकोस. त्याने प्रयत्न करायला हवे होते. पण त्याने ते नाही केलं. पण जे झालं ते मी स्विकारलय त्या गोष्टीचा मला काही राग नाही."

Recommended

Loading...
Share