नुकत्याच भेटीला आलेल्या कुसुम या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री शिवानी वाबकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अजिंक्य ननावरे अनुजची भूमिका साकारतोय. अभिनेत्री आरती मोरे या मालिकेत नेहा ही व्यक्तिरेखा साकारतेय. दिवाळीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीच्या विशेष भागात या कलाकारांनी एकत्र येऊन खास दिवाळी सेलिब्रेशन केलय. यावेळी पिपींगमून मराठीने कुसुम मालिकेतील कलाकारांसोबत गप्पा मारल्यात.
शिवानी म्हणते की "फराळ आणि अभ्यंगस्नान महत्त्वाचं असत. मला फराळ खायला खूप आवडतं. आणि अभ्यंगस्नान म्हणजे एक सेल्फ पॅम्परिंग सारखं असतं." तर अजिंक्य म्हणतो "या निमित्ताने आमचा सर्व परिवार एकत्र येतो." आरती मोरेसाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास आहे. कारण नाट्यगृहे सुरु झाली आहेत. त्यामुळे आरतीचा आनंद द्विगुणीत झाल्याचं ती सांगते