By  
on  

पाहा Video : यावेळी स्पर्धक जास्त अभ्यास करून आलेले दिसतायत - माधव देवचके, पाहा 'बिग बॉस वाले'

सध्या बिग बॉस मराठीचं तिसरे पर्व सुरु आहे. काही दिवसातच हा खेळ चांगलाच रंगलेला दिसतोय. यातच सोशल मिडीयावर या सिझनविषयी बरीच चर्चा होताना दिसत आहे. बिग बॉस वाले या पिपींगमून मराठीच्या नव्या मुलाखतीच्या सिरीजमध्ये बिग बॉस मराठी सिझन 2 चा स्पर्धक, अभिनेता माधव देवचकेसोबत संवाद साधलाय. यावेळी माधवने त्याच्या सिझनच्या आठवणींना उजाळा दिलाय. शिवाय तिसऱ्या सिझनविषयीचं त्याचं मत व्यक्त केलय.

माधव म्हणतोय की, "यावेळी स्पर्धक जरा जास्तच बिग बॉसचा अभ्यास करुन आलेले दिसत आहेत. बिग बॉस मराठीचे तर दोनच सिझन झालेत. मात्र हे स्पर्धक हिंदी बिग बॉस जास्त बघून आल्याचं जाणवतय. त्यांच्या वागणुकीवरुन ते दिसतय." तिसऱ्या पर्वातील स्पर्धकांपैकी स्नेहा वाघ, विकास पाटील यांना ओळखत असल्याचं माधवने सांगितलय. स्नेहाला मी खूप आधीपासून ओळखतोय. आम्ही एकत्र काम केलय. तिला सगळ्यांशी बोलणं गरजेचं आहे." याशिवाय इतर स्पर्धकांविषयीचं मतही त्याने या मुलाखतीत व्यक्त केलय.

Recommended

PeepingMoon Exclusive