पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या सेटवर, धनाजी संताजी साकारणारे कलाकार सांगत आहेत अनुभव

By  
on  

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  ताराराणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ही अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. या मालिकेत या भूमिका साकारत आहेत अभिनेते अमीत देशमुख आणि रोहित देशमुख. 

अभिनेते अमित देशमुख हे या मालिकेत संताजी घोरपडे यांची भूमिका साकारत आहेत तर अभिनेते रोहित देशमुख धनाजी जाधव यांची भूमिका साकारत आहेत. पिपींगमून मराठीने या मालिकेच्या सेटवर जाऊन या कलाकारांसोबत संवाद साधलाय. यावेळी त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी सांगितलं. मालिकेचं चित्रीकरण करत असताना तो काळ जगत असल्याचही ते म्हणाले.

Recommended

Loading...
Share