बिग बॉस मराठी 3 च्या घरात काही दिवसांपूर्वी काही पाहुणे गेले होते. हे पाहुणे म्हणजे यंदाच्या सिझनमधील स्पर्धक. आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एन्ट्री झाली होती. स्नेहा वाघची एन्ट्री मात्र लक्षवेधी ठरली होती. याच निमित्ताने स्नेहा वाघसोबत पिपींगमून मराठीने एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी स्नेहाने बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण दिलय.
स्नेहा म्हटली की, “माझ्या मागून काय गोष्टी सुरु होत्या ते मला अजीबात कळाल्या नाहीत. सगळ्यांनी त्या गोष्टी मागून केल्या. पण बिग बॉसचं घरच असं आहे की जिथे मागून बऱ्याच गोष्टी होतात. पण मी तशी नाहीय. मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला बऱ्याचशा अशा गोष्टी कळाल्या ज्या मला जास्त विचित्र वाटल्या. मला त्रासही झाला. मी ज्या ज्या लोकांना आपलं मानलं होतं त्या त्या लोकांच्या तोंडून या गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी खूप भावुक व्यक्ति आहे. त्यामुळे त्याचा त्रास झाला.”