तुझ्या रुपाचं चांदनं ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर भेटीला आली आहे. या मालिकेत गरीब घरातील सुंदर मुलगी दाखवण्यात आलीय. मात्र समाजात वावरण्यासाठी तिच्या सुंदरतेवर तिची आईच काळा रंग चढवते. हा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय शिवाय एक वेगळा विषयही यातून हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय.
अभिनेत्री तन्वि शेवाळे या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. तर अभिनेता रोहीत निकम देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या निमित्ताने दोघांसोबत पिपींगमून मराठीने गप्पा मारल्यात.