By  
on  

पाहा Video : 'पांघरुण' चित्रपटातील कलाकारांसोबत खास बातचीत

महेश मांजरेकर दिग्दर्शिक पांघरुण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मानलेली मुलगी गौरी इंगवलेने मुख्य भूमिकेतून पदार्पण केलय. गौरी इंगवलेसह अमोल बावडेकर, रोहित फाळके हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 

पिपींगमून मराठीने नुकतच या चित्रपटातील कलाकारांसोबत बातचीत केली आहे. यावेळी या कलाकारांनी या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. गौरी ही खऱ्या आयुष्यात उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे या चित्रपटातील लक्ष्मीची भूमिका साकारण्यासाठी त्याचाही तिला चांगला उपयोग झाल्याचं ती सांगते.

Recommended

PeepingMoon Exclusive