By  
on  

पाहा Video : 'पांघरुण' चित्रपटाचा असा जुळून आला योग... महेश मांजरेकर यांच्यासोबत खास बातचीत

आजवर वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येणार दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पांघरुण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यपूर्व काळ, त्या काळच्या रुढी परंपरा, बालविवाह याची झलक असलेली बा. भ. बोरकर यांच्या कथेवरुन प्रेरणा घेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटातून एक सुंदर सांगितीक मैफल प्रेक्षकांना अनुभवायला मिळतेय.

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत पिपींगमून मराठीने बातचीत केली आहे. यावेळी हा चित्रपट कसा तयार झाला, गौरी इंगवले या चित्रपटासाठी कशी निवडली गेली, चित्रपटातील सांगितीक मैफल या सगळ्या गोष्टींवर महेश मांजरेकर बोलते झाले. मागील वर्षी बिग बॉस मराठी हा कार्यक्रम महेश मांजरेकर यांच्या सूत्रसंचालनाने प्रचंड गाजला. या कार्यक्रमाचे सलग तीनही पर्व महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले. मात्र बिग बॉस मराठीसोबतच तीन वर्षांचा करार आता संपला असल्याचे महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीत सांगितले.

Recommended

PeepingMoon Exclusive