
नागराज मंजुळे दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट 'झुंड' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटासह चित्रपटाच्या संगीताचंही कौतुक केलं जातय. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठी दोघांसोबत खास एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी त्यांनी यंदा संगीतात केलेल्या प्रयोगाविषयी सांगितलं. प्रत्येक गाण्याला एक वेगळी शैली देण्यात आली असून झुंडच्या संगीतात विविध प्रयोग केले असल्याचं यावेळी अजय - अतुल म्हटले.