
सारखं काहितरी होतय या नाटकातून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने लेखन - दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या नाटकात अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर ही जोडी रंगमंचावर दिसतेय. तब्बल 36 वर्षांनी हे दोघं रंगमंचावर काम करतायत. तर अभिनेता, निवेदन म्हणून काम करणारा संकर्षण एकाचवेळी बरीच काम करताना दिसतोय. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील भूमिका, किचन कल्लाकार कार्यक्रमाचं निवेदन आणि या नाटकासाठी असं एकत्र काम करत असताना इतर सांभाळून घेत असल्याचं तो पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगतो.