पाहा Video : स्मिता गोंदकरने आयोजित केली बिग बॉस मराठीची धमाल रियुनियन पार्टी, कलाकारांसोबत गप्पा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या तिन्ही यशस्वी सिझननंतर आता प्रेक्षकांना चौथ्या सिझनचीही उत्सुकता आहे. मात्र मागील तीन्ही सिझनने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केले. या तिनही सिझनमधील कलाकार या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. बिग बॉस मराठीच्या घरात झालेली मैत्री घराबाहेर आल्यानंतरही चांगली टिकली. याचच उदाहरण पाहायला मिळालं नुकत्याच झालेल्या रियुनियन पार्टीत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये झळकलेली स्मिता गोंदकर दरवर्षी बिग बॉस मराठीच्या सर्व कलाकारांना एकत्र आणून रियुनियन पार्टी आयोजित करते. यंदाही स्मिताने खास रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बिग बॉस मराठीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सिझनमधील स्पर्धक कलाकार एकत्र आले आणि त्यांनी धमाल पार्टी केली. डान्स मस्ती आणि गप्पांनी रंगलेली ही पार्टी चांगलीच चर्चेत आलीय. या पार्टीच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने या कलाकारांसोबत खास गप्पा मारल्यात. यावेळी या कलाकारांनी या पार्टीचा मनमुराद आनंद लुटलाय. 

Recommended

Loading...
Share