पाहा Video : महेश मांजरेकर घरात बसून करत आहेत या गोष्टी

By  
on  

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर या लॉकडाउनमध्ये घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या  मुलांसोबत मिळून 'वास्तव-2' ही शॉर्ट फिल्म बनवली होती. यात महेश मांजरेकर यांच्या मुली आहेत आणि मुलगा सत्या मांजरेकरने ही फिल्म शुट केली होती. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत त्यांनी यााविषयी सांगीतलं. शिवाय या लॉकडाउनमध्ये दररोज कुकिंग करत असल्याचंही महेश मांजरेकर म्हटले. 

या लॉकडाउनमध्ये सुचनांचं पालन करत सगळ्यांनी घरात बसणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगीतलं. शिवाय घरात बसून मुलांना इम्प्रोवायझेशनचे धडे ही महेश मांजरेकर देत आहेत. मुलगी सई, मानलेली मुलगी गौरी, मुलगा सत्या आणि पत्नि मेधा यांच्यासोबत महेश मांजरेकर वेळ घालवत आहेत. या निमित्ताने पहिल्यांदाच इतका वेळ घरात असल्याचंही मांजरेकर म्हणाले.

Recommended

Loading...
Share