EXCLUSIVE : ऋषी कपूर यांना शेवटच्या काळात भेटता न आल्याचं चंकी पांडेला दु:ख

By  
on  

अभिनेता चंकी पांडे हा लहानपणापासूनच ऋषी कपूर यांचा मोठा चाहता आहे. ऋषी यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आल्याचं तो सांगतो. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत चंकी पांडेने ऋषी यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. चंकी पांडे हा ऋषी कपूर यांचा फॅमिली फ्रेंडही होता. त्यामुळे कपूर्स पार्टीत तो त्यांना बऱ्याचदा भेटायचा. त्यांच्यासोबत सिनेमात काम केल्याच्या आठवणीही त्याने जागवल्या. मात्र शेवटच्या काळात ऋषी कपूर यांना भेटता न आल्याची खंत चंकी पांडेच्या मनात आहे आणि त्याचं त्याला दु:ख असल्याचं त्याने सांगीतलं.

 

Recommended

Loading...
Share