
लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वातील कलाकार विविध कॉन्सेप्ट घरात बसूनच करत आहेत. कलाकार घरात बसूनच शॉर्ट फिल्म्स तयार करत आहेत, तर कुणी व्हिडीओ बनवत आहेत. यातच प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस तेरुरकरने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकारांसह घरात बसूनच फोटोशुट केले आहे. फोन टू फोन फोटोग्राफी करत त्याने कलाकारांचे उत्तम फोटो क्लिक केले आहेत. सोशल मिडीयावर त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय त्याच्या या कामाचं कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत तेजसने त्याचं फोटोग्राफीविषयी असलेली आवड आणि बऱ्याच गोष्टी शेयर केल्या. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांच्यासोबतच्या खास आठवणीही त्याने सांगीतल्या. शिवाय ट्रेकिंग करत असताना त्याला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली असल्याचं तो यावेळी म्हटला. त्याने दिलेली ही मुलाखत उत्तम छायाचित्रकार बनू पाहणाऱ्या इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल.