अखेर दिशा परमारने राहुल वैद्यच्या लग्नाच्या प्रस्तावाला दिला होकार

By  
on  

बिग बॉस या शोच्या 14व्या पर्वात स्पर्धक बनलेला गायक राहुल वैद्यने बिग बॉसच्या घरात त्याची मैत्रीण दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. राहुलने बिग बॉसच्या घरात टीशर्टवर दिशाचं नाव लिहून तिला प्रपोज केलं. मात्र दिशाचं उत्तर राहुलपर्यंत पोहोचलं नाही. राहुलसह अनेक बिग बॉस फॅन दिशाच्या उत्तरासाठी वाट पाहत होते. मात्र त्यानंतर राहुलने बिग बॉसच्या शोमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर बिग बॉसने राहुलला पुन्हा एक संधी दिली आहे. आणि राहुल आता पुन्हा बिग बॉसच्या घरात आला आहे. 

नुकतच राहुलने दिशाचा उल्लेख करून दिशाचं उत्तर काय आहे हे सगळ्यांना सांगीतलं. दिशाने लग्नासाठी होकार दिला असल्याचं राहुलने सांगीतलं आहे. 

राहुल आणि दिशा मागील दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शिवाय बिग बॉसच्या घरात आल्यानंतर राहुलला दोघांच्या लग्नाविषय़ी बाकी स्पर्धकांनी विचारल्यावर अजून लग्नासाठी वेळ असल्याचं राहुलने सांगीतलं. लग्न होणार पण त्याला अजून वेळ असल्याचं राहुल बोलला. जेव्हा स्पर्धक अली गोनीने राहुलला विचारलं तेव्हा राहुलने मानेनं होकार देऊन त्याला याचं उत्तर सांगीतलं.

Recommended

Loading...
Share