बिग बॉस 12 च्या घरातून मराठमोळी नेहा पेंडसे झाली बेघर

By  
on  

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉस 12 च्या स्पर्धकांपैकी एक. पण या आठवड्याच्या वीकेंड का वारमध्ये बोल्ड आणि ब्युटीफुल नेहा पेंडसेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ आली. त्यामुळे चाहत्यांची प्रचंड निराशा झालीय.

अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. पण करणवीर या नॉमिनेशनमधून सुखरुप बचावला तर नेहाला घरातून बाहेर पडावं लागलं. ‘कालकोठरी’ची शिक्षा गांभिर्यानं न घेतल्यानं नेहा, करणवीर बोहरा आणि श्रीसंतला नॉमीनेट करण्यात आलं होतं. श्रीसंतची रवानगी सिक्रेट रुममध्ये करण्यात आली आहे.

कुठल्याही गटबाजी किंवा वादात न पडता नेहा स्वत:चा खेळ खेळत होती. तसंच बिग बॉसच्या घरातील एक शक्तिशाली स्पर्धक म्हणून नेहाकडे पाहिलं जायचं. मराठीसोबतच हिंदीतही ‘मेय आय कम इन मॅडम’ या मालिकेमुळे तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण करणवीरला नेहापेक्षा जास्त मतं पडल्याने नेहाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

 

 

 

Recommended

Loading...
Share