By  
on  

PeepingMoon Exclusive : असं दिसतं 'बिग बॉस मराठी 3' चे कन्फेशन रुम, पाहा फोटो

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं पर्व काही तासांवर येऊन ठेपलय. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक कोण असणार याची उत्सुकता आहे. शिवाय बिग बॉस मराठी 3 चं आलिशान सुंदर घर आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर समोर आलेत. दरवर्षी बिग बॉस या कार्यक्रमासाठी खास हटके घर डिझाईन करण्यात येतं. असचं सुंदर घर यंदाच्या सिझनसाठी देखील आहे. 

 

गार्डन, लिव्हिंग रुम, बेडरूम, किचन यासह विविध खोल्या लक्षवेधी ठरत आहेत. यातच सगळ्यात महत्त्वाची खोली अद्याप समोर आलेली नाही. ही खोली म्हणजे कन्फेशन रुम.

याच खोलीतून बिग बॉस स्पर्धकांसोबत संवाद साधत असतात. याच कन्फेशन रुमची झलक पिपींगमून मराठीच्या हाती लागली आहे. 

गुलाबी रंगाच्या या सुंदर कन्फेशन रुममध्ये एक आलिशान सोफा ठेवण्यात आलाय. यंदा एक मोठी कन्फेशन रुम बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळतेय. येत्या 19 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive