बिग बॉस मराठी 3 Day 3 : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ..दादूसने जिंकली मनं !

By  
on  

यंदाचा बिग बॉसचा सीझन तिसरा अनेक कारणांनी चर्चेत आहे. अनेक विविध व्यक्तिमत्त्वांची माणसं एकाच छताखाली राहतायत. घरात टिकण्यासाठी प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करतोय. याशिवाय प्रत्येक टास्कमध्ये आपण बाजी मारावी याचीही प्रत्येक सदस्य पुरेपूर काळजी घेतोय. अशातच एक टास्क बिग बॉसने स्पर्धकांना दिला होता. ज्यात एकाने आपण वाईट शेफ असल्याचं सिध्द करायचं होतं तर दुस-याने तो पदार्थ खाऊन दाखवायचा होता. 

 

सर्वात वाईट आचारी म्हणून अक्षयने किचना ताबा घेत एक अत्यंत वाईट पदार्थ टास्कमध्ये बनवला. तर अचानक थबकलेला पाहुणा असलेले दादूस फेम संतोष चौधरी यांना तो पदार्थ काऊन दाखवायचा होता. कोणताही कुंतू परंतु न करत दादूस यांनी तो पदार्थ संपवण्याचा प्रयत्न  केला, तोच बिग बॉसनी घोषणा करत पुरे झाले म्हणून त्यांच्या हिंमतीची दाद दिली. 

 

दादूसचे असंख्य फॅन आहेत पण कालच्या त्यांच्या  या खिलाडी वृत्तीमुळे त्यांनी सर्वच प्रेक्षकांच्या हदयात स्थान मिळवलंय.  

Recommended

Loading...
Share