Bigg Boss Marathi 3 Day 5 : फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये अशी रंगली जुगलबंदी, मीरा आणि जयमध्ये पुन्हा वाद

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली. उत्कर्ष शिंदे या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्य जिंकून त्याचा पहिला विजेता ठरला. उत्कर्षला विशेष अधिकार देण्यात आला ज्यामध्ये त्याला एका महिला सदस्याची सहविजेती निवड करायला सांगितली आणि उत्कर्षने मीरा जगन्नाथ हिची निवड केली. त्यामुळेच मीरा आणि उत्कर्ष शक्तिपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी ठरले. शक्तिपदक जिंकणारा सदस्य एका नव्या अध्यायाशी जोडला जाणार आहे.

आता या दोघांमध्ये हे पदक मिळण्यासाठी एक सामना रंगणार आहे. हे कार्य फक्त Temptation Room साठी नसून बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील पहिले कॅप्टनपद मिळवण्याच्या बहुमानासाठी देखील असणार आहे.

जो सदस्य कार्यात विजेता ठरेल त्या सदस्याला Temptation Room आणि कॅप्टनपद यामध्ये निवड करावी लागणार आहे. कालपासूनच घरामध्ये खेळ फाशाचा सुरू झाला आहे. फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये  जुगलबंदी रंगली आहे. यात वादही तितकेच होत आहेत.   


मीरा आणि जय मध्ये जोरदार भांडण होणार आहे. जय म्हणाला "संचालिका जर ही जुडो कराटे खेळली तर मी नॅशनल लेवल प्लेयर आहे मी स्विमिंग पूल मध्ये टाकून देईन मग". यात जयला विकास शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. कोण जिंकेल हा टास्क यासाठी आजचा भाग पाहावा लागणार आहे.

Recommended

Loading...
Share