बिग बॉस मराठी 3 : मीराला आला स्नेहाचा राग, गायत्री आणि मीरामध्ये स्नेहाविषयी झाली ही चर्चा

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात पहिल्याच आठवड्यात कोणतही एलिमिनेशन झालं नाही. मात्र या आठवड्यात एलिमिनेशन होणार आहे. तेव्हा या आठवड्यातील टास्क स्पर्धक कसे खेळतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र याशिवाय पहिल्याच विकएन्डच्या चावडीनंतर घरात स्पर्धकांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. 

 पहिल्याच आठवड्यात मीरा आणि गायत्रीची मैत्री पाहायला मिळाली. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावले देखील. मीराच्या मागे मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतो आहे असं ते म्हटले. मीरा आणि गायत्री आता स्नेहा विषयी देखील बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली की, “स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुपमध्ये कीडे करते आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते. आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाहीये."

यावर गायत्री म्हणाली की, “स्नेहा मानत नाही तिने असं काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू ? मी तिला म्हणाले माझं तुला सांगण आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं रहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखा ताईंना देखील तसंच वाटलं होतं, आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोली असतं असं काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली असती तर ठीक होतं मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातुन दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला इतका”.

मीरा आणि गायत्रीच्या या चर्चेनंतर दोघी आता स्नेहाला टार्गेट करणार की काय असं चित्र दिसतय. विकएन्डला गायत्रीने स्नेहाकडे जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्नेहाने उडवाउडवीची उत्तर देतं गायत्रीच्या बोलण्यावर इतका प्रतिसाद दिला नाही ज्यामुळे गायत्री लगेचच तिथून निघून गेली होती. रात्री मात्र या मुद्द्यावर गायत्री आणि मीरा चर्चा करताना दिसल्या.


 आता हा मुद्दा या आठवड्यात किती ताणला जाईल हे पुढील भागांमधून समोर येईलच.
 
 

Recommended

Loading...
Share