By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 9 : 'हल्लाबोल' टास्कदरम्यान विशाल निकम आणि अक्षय वाघमारेमध्ये झाला पंगा

बिग बॉस मराठीचं तिसर सिझन पहिल्या दिवसापासूनच विविध वादांमुळे चर्चेत आलय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना नुकताच एक टास्क दिलाय. या टास्कमुळे आणखी वाद वाढताना दिसतोय. हल्लाबोल या टास्कसाठी स्पर्धकांची दोन गटात विभागणी केलीय. यात सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची या टास्कमध्ये अयशस्वी ठरल्याने विशाल आणि विकास बाईकवर बसले आणि त्यांनी हार पत्करली नाही.

तर आता दुसऱ्या गटाची बाईकवर बसण्याची वेळ येणार आहे. ज्यात सुरुवातीला जय दुधाणे आणि गायत्री दातार हे दोघं बसणार आहेत. या दोघांना उठवण्यासाठी समोरचा गट प्रयत्न करताना दिसेल. 

यात जय आणि गायत्रीला उठवण्यासाठी विशाल आणि विकास साबणाच्या पाण्याचा मारा करताना दिसतील. मात्र यात दोन गटांची शाब्दिक भांडणं देखील सुरु आहेत. अशात विशाल आणि अक्षय मध्ये वाद होताना दिसला. या वादात विशालने तेच पाणी अक्षयच्या अंगावर टाकले, ज्याने अक्षय चिडला आणि दोघांमध्ये पंगा झाला. नेमकं दोघांमध्ये काय होणारेय हे आजच्या भागात पाहायला मिळेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive