बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत.
याचसोबत दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले आणि काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले.
शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, “ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार. ते असतना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”
मीनलने देखील सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे... तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतकी माहिती आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाहीये."