By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 12 : स्पर्धकांना त्यांचे फोन परत मिळणार? उडणार एकच धम्माल , पाहा video

बिग बॉस मराठीचा यंदाचा ३ रा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे. गेले दोन आठवडे स्पर्धकांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यातच हल्ला-बोल टास्कने घरातलं अवघं वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच प्रकृतीच्या कारणास्तव युवा किर्तनकार शिवलीला यांनी बिग बॉसच्य खेळातून माघार घेतल्याने या आठवड्यात कोणीचे घराबाहेर गेलं नाही. आता पुढच्या आठवड्यात एक तरी स्पर्धक नक्कीच घराबाहेर जाणार याची महेश मांजरेकर यांनी गॅरण्टी दिलीय. 

त्यातच स्पर्धकांनी नव्या आठवड्या मोठ्या उत्साहाने ह्या खेळात टिकून राहण्यासाठी पण केला आहे. अशातच स्पर्धकांना त्यांचे फोन परत मिळणार आहेत, त्यामुळे घरात एकूणच आनंदी आनंद झाला आहे. सगळेच सातवें आसमान पर आहेत, पण शेवटी हे सामान्य घर नाही बिग बॉसचं घर आहे. या फोन मिळण्यामागे नेमका काय ट्विस्ट असणार आहे, हे बिग बॉसलाच ठाऊक. 

स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार, न जाणे पुढे काय, काय गोंधळ उडणार? हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड चुकवून चालणार नाही. 

 

नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये घरामध्ये एक फोन दिसत आहे. म्हणजेच आज घरामध्ये एक फोन पाठवण्यात येणार आहे. त्या फोनची रिंग वाजली आणि घरामध्ये एकच आवाज घुमला “फोन आला, फोन आला”. आणि त्यातून बिग बॉस यांचा आवाज आला. ज्यामध्ये त्यांनी घोषित केले सदस्यांना त्यांचे फोन्स परत देणार. फोन जयने घेतला होता, आणि जयने हे सांगताच सदस्यांचा काही विश्वास त्यावर बसेना. बघूया काय होतं पुढे.

सुरेखाताई, गायत्री, मीनल, मीरा आणि दादुस या सदस्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. ज्यामध्ये सुरेखाताई दादुस यांना सांगताना दिसणार आहे, “आम्ही शूटिंगमध्ये जेव्हा कानाखाली लावतोना तेव्हा कसं असंत माहिती” ? आणि मग त्यांची मज्जा मस्ती सुरू झाली. पण हे करू दाखवताना दादुस यांना खरोखरच चुकून फटका बसणार आहे.पुढे अजून घरामध्ये काय होत हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठीवर.  

 

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive