By  
on  

बिग बॉस मराठी 3 : विकासने शेअर केलेल्या 'त्या' गोष्टीने तमाम प्रेक्षकांचेही डोळे पाणावले

छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉस मराठी 3 चा खुप मोठा बोलबाला आहे. यंदाचा सीझन मागच्या दोन सीझनपेक्षा खुप वेगळा ठरणार आहे. गेले दोन आटवडे स्पर्धक कलाकारांनी घरात अक्षरश: धुमाकूळ घातलाय. टास्क आणि गटबाजीत सर्वौत्तम ठरुन घरातलं आपलं स्थान अबाधित करण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. या घरात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो.  अशातच बिग बॉसच्या घरात काही हळवे क्षणांची देवाण-घेवाण झाल्याचे प्रेक्षकांना अनुभवता आले. 

टीम बी मधील स्पर्धक विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि आविष्कार दारव्हेकर हे फावल्या वेळेत सहजच गप्पा मारताना दिसले. तेव्हा विकासने आपल्या सहसदस्यांसोबत त्याच्या मुलाबद्दलची एक हळवी गोष्ट शेअर करत स्वत:चं मन हलकं केलं. विकास या सर्वांना म्हणाला, की त्याचा  मुलगा आता आठ वर्षांचा आहे. परंतु तो जेव्हा ३ वर्षांचा होता तेव्हा एकदा सोसायटीच्या आवारात खेळत असताना, पाण्याच्या टाकीत पडला होता. तेव्हा -7-8 मिनीटं सलग पाण्यात राहिल्याने त्याच्यावर परिणाम झाला आहे. तो एक मोठा अपघात होता. आता तो गेले पाच वर्ष अंथरुणालाच खिळून आहे. त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट सुरु आहे. तो चांगला प्रतिसादही देतोय, पण जरा वेळ लागेल आणि त्याची पत्नी मुलाची योग्य काळजी घेत त्याचा सांभाळ करतेय.

मुलगा मौर्यच्या आठवणीत विकास खुप भावूक झाला. सोनाली, मीनल या सगळ्यांनी त्याला तो लवकरच बरा होईल असा सकारात्मक धीर दिला. 

विकासच्या मुलाबाबतची ही हळवी गोष्ट ऐकून  महाराष्ट्रीतील तमाम प्रेक्षकांचे डोळे टेलिव्हिजन पाहताना पाणावले. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive