बिग बॉस मराठी 3 : टास्कनंतर तृप्ती देसाई आणि मीरा जगन्नाथमध्ये जुंपली

By  
on  

बिग बॉस मराठी 3 मध्ये सध्या बिग बॉसे घरातील विविध खोल्या आणि वस्तूंसाठी स्पर्धकांना विविध कार्य दिली आहेत. दोन गटात विभागून दिलेल्या या टास्कमध्ये स्पर्धक कंबर कसून खेळताना दिसत आहेत. यातच टास्कदरम्यान विविध वाद होताना देखील दिसत आहेत. 

नुकतेच काही टास्क बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेत. मात्र त्यानंतर पुन्हा एक नवा वाद समोर आलाय. यावेळी हा वाद झाला एकाच गटात खेळत असणाऱ्या तृप्ती देसाई आणि मीरा जगन्नाथ यांच्यामध्ये. यावेळी मीरा तिची बाजू मांडताना म्हणते की, "पलटी हा शब्द तुमच्यासाठी नव्हता"

यावर तृप्ती देसाई पुढे मीरावर ओरडून बोलतात की "आवाज कधी चढवला नाही मी. किती शब्द फिरवतात. स्वत:ला बिग बॉस समजते. हिला वाटतं 14 जण नाही तर ही एकटीच खेळायला आलीय."

 

आता मीरा आणि तृप्तीमध्ये पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात वाद होताना दिसलाय. काय असेल या वादाचं नेमकं कारण ? हे आजच्या भागात बघायला मिळेल.

Recommended

Loading...
Share