By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 15 : बिग बॉस मराठीच्या घरात 'डान्स पे चान्स', स्पर्धकांचा धमाल डान्स

बिग बॉस मराठीच्या घरात वाद - विवाद तर होतातच पण कधी कधी डान्स - मस्तीही पाहायला मिळते. अशीच डान्स मस्ती नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळालीय. यावेळी स्पर्धकांनी एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स सादर केले.

 

कॅप्टन्सीसाठी डान्स पे चान्स हे कार्य देण्यात आलं होतं.  पुढील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागामध्ये कळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकापेक्षा एकअसे गेटअप केले आहेत.

ज्यात स्पर्धकांच्या जोड्या नेमून दिल्या होत्या. या जोड्यांनी धमाकेदार डान्स परफॉर्मन्स यावेळी सादर केले. सुरेखा कुडची  - अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस) – आविष्कार दारव्हेकर, मीनल शाह – गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे - सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ – तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ – विकास पाटील या जोड्या असणार आहेत.

नेमका हा टास्क काय होता ? स्पर्धकांनी हा टास्क कसा केला हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive