By  
on  

बिग बॉस मराठी 3 : अभिनेता आदिश वैद्य बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून करणार एन्ट्री ?

बिग बॉस मराठी सिझन 3 चा खेळ आता रंगात आला आहे. बिग बॉस स्पर्धकांना विविध टास्क देताना दिसत आहेत. स्पर्धकांनीही आता कंबर कसली आहे. घरात दोन गट पडले असल्याने आता कॅप्टन्सी टास्कमध्ये नवे वाद निर्माण झाले आहेत. यात आता बिग बॉस मराठीच्या घरात एक नवी एन्ट्री होत आहे.

 

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला सुरुवात होऊन काहीच दिवस झालेले असताना आता घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. आज बिग बॉस मराठी विकएन्ड चावडी रंगणार आहे. यात एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसतय.

मात्र सध्या या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची जोरदार चर्चा आहे. अभिनेता आदिश वैद्य हा वाईल्ड कार्ड स्पर्धक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रोमोवरुनही अनेकांनी हा अंदाज बांधलाय. विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध असलेला आदिश हा आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलय. 'गुम है किसीके प्यार में' या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आलय.

आता हा वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिशच आहे की कोणी दुसरा हे आजच्या चावडीच्या भागात समोर येईलच. याशिवाय चावडीवर यंदा महेश मांजरेकर कुणाची शाळा घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive